मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंत्री बच्चू कडू रवाना झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी कडूंवर जहरी टीका केली आहे.
शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवण्यासाठी मोटारसायकलवरून दिल्लीत जाण्याची नौटंकी कडू करत आहेत. त्यांनी आधी आपल्या घरातील अंधार दूर करावा आणि नंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, असं शिवराय कुळकर्णी यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडूंच्या स्वत:च्या मतदरसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असं आव्हानही कुळकर्णी यांनी कडूंना दिलं आहे.
दरम्यान, बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या उमा बॅरेज, नेर धामना, पूर्णा बॅरेज, नया अंदुरा हे प्रकल्प बंद पडले आहेत. पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत असताना राज्याच्या मंत्री मंडळात मूग गिळून गप्प बसले असल्याचंही कुळकर्णींनी म्हटलं आहे. यावर बच्चू कडूंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”
“भाजपसोबत राहिलो असतो तर मुख्यमंत्री असतो, काँग्रेसमुळे सगळं संपलं”
“ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील
भाजपच्या ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत केला प्रवेश
“दम असेल कर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची झाली तरी द्या”
Comments are closed.