महाराष्ट्र मुंबई

‘कोणाच्या धमकीला घाबरत नाही’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

मुंबई | कोणी कोणाला धमकी देण्याची गरज नाही. कोणी कोणाला घाबरत नाही, अशा शब्दात भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना उत्तर दिलं आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पडळकर यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. त्याचवेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्‍यांकडून काहीही प्रतिक्रिया उमटू शकतात, असा इशारा दिला होता. त्याला लगेचच चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय.

आपण वादग्रस्त विधान करणार नाही, असं हसन मुश्रीफ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. पण आज ते पुन्हा वेगळे बोलले आहेत. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

याची सुरुवात कोणी केली, याच्या खोलात गेले तर आणखी कलगीतुरा होऊ शकतो. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.  त्यामुळे एकदाचा हा विषय संपला पाहिजे. अन्यथा हा विषय कोठेपर्यंत ही कुठेही भरकटू शकतो, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

महत्वाच्या बातम्या-

नाना पाटेकरांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन घेतली त्याच्या कुटुंबियांची भेट

पुण्यात आज 328 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या