भाजपचे सोशल मीडिया पदाधिकारी आणि सोशल मीडिया समर्थकांमधील वाद पेटला

BJP Third Candidate

Bjp Maharashtra | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची जोरदार पिछेहाट झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीला रोखण्यात भाजप सपशेल अपयशी ठरली तसेच स्वतःच्या हक्काच्या जागा सुद्धा भाजपला गमवाव्या लागल्या त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. यातच आता भाजपचे सोशल मीडिया सांभाळणारे पदाधिकारी आणि भाजपचे सोशल मीडियावरील समर्थक यांच्यात वाद पेटला आहे.

फेक नेरेटिव्हबद्दल देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य-

भाजपविरोधात अनेक फेक नेरेटिव्ह पसरवण्यात आले आणि या फेक नेरेटिव्हचा सामना करणं किंवा ते हाणून पाडणं आपल्याला जमलं नाही, अशा अर्थाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. त्यानंतर भाजपच्या सोशल मीडिया समर्थकांनी फेक न्यूज तसेच फेक नेरेटिव्हचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. याचा फटका त्यांच्याच सोशल मीडिया सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बसू लागला.

प्रतिपक्ष नावाने यूट्यूब चॅनेल चालवणारे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी नुकताच एक व्हिडीओ प्रकाशित केला होता. यामध्ये त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर कठोर शब्दात टीका केली होती. या प्रकरणी भाजप पदाधिकारी श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांना लीगल नोटीस पाठवली होती, त्यानंतर या विषयातील वादाला जास्तच तोंड फुटलं.

सोशल मीडियावरील भाजप समर्थकांनी भाऊ तोरसेकर यांची बाजू घेत भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या कामावर शंका उपस्थित केल्या. अशा पदाधिकाऱ्यांना हटवून निष्ठेनं पक्षाची बाजू लावून धरणारांची तिथं नेमणूक करावी, अशी मागणी सुद्धा अनेकांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली. या प्रकरणात सरळ सरळ दोन गट पडल्याने भाजपमधील हा वाद चांगलाच भडकल्याचं पहायला मिळालं.

दुसरीकडे श्वेता शालिनी यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले. त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देणारी एक सविस्तर पोस्ट ‘एक्स’ या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भाऊ तोरसेकर यांच्याविरोधात केलेली कारवाई मागे घेत असल्याची सुद्धा माहिती दिली आहे.

Bjp Maharashtra | श्वेता शालिनी यांची पोस्ट-

दरम्यान, हा विषय आता भाजपच्या अंतर्गत चर्चेसाठी आल्याची माहिती आहे. अशा प्रकराच्या वादामुळे पक्षाचे समर्थक दुखावले जात आहेत. तसेच पक्षाची प्रतिमा सुद्धा मलीन होत आहे त्यामुळे या प्रकरणी भाजप पक्षनेतृत्त्वाने गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. थोड्याच दिवसात वरिष्ठांकडून यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले जाऊ शकतात, अशी सुद्धा माहिती आहे. मात्र कारवाई होणार की अभय मिळणार याची भाजप समर्थकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी एकटा पडलोय, पण मी मागे हटणार नाही”, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

रिसेप्शनसाठी सोनाक्षीने घातली तब्बल ‘इतक्या’ लाखांची साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल

“येत्या दोन दिवसांत राज्याला हादरवून सोडणारा खुलासा करणार”; बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .