नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. भाजप 55 जागा जिंकणार असल्याचा दावा दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी मतमोजणीपूर्वीच केला आहे.
मी या निकालाबाबत आजिबात चिंतेत नाही. कारण मला विश्वास आहे की, भाजपसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज भाजप दिल्लीत सत्तेत येणार आहोत, असं मनोज तिवारी म्हणाले आहेत.
भाजपने 55 जागा जिंकल्यावर आश्चर्य वाटायला नको, असं म्हणत तिवारींनी दिल्लीत भाजप सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजप दिल्ली विधानसभेत मोठ यश मिळवेल, अशी आशाही तिवारींनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप, आप आणि काँग्रेस या 3 पक्षांमध्ये लढत होती. मात्र भाजप आणि आप या दोन्ही पक्षात मुख्य लढत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांच्या बारामतीत रंगणार रणजी क्रिकेटचा थरार
छातीवर गोळ्या खाईल म्हणणाऱ्या औवैसींना भाजपचं प्रत्युत्तर
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कोणाची???; आज होणार फैसला
आघाडीच्या काळातले अपूर्ण प्रकल्प तात्काळ पूर्ण करा- छगन भुजबळ
उदयनराजेंवर चाहत्याचं निस्सीम प्रेम; अमित शहांना लिहिलं रक्तानं पत्र!
Comments are closed.