सत्तेसाठी कायपण!!! ‘भाजप’नं घेतली ‘एमआयएम’ची साथ!

औरंगाबाद | सत्तेसाठी एकमेकांचे कट्टर विरोध देखील वेळप्रसंगी एकत्र येतात. औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये हा प्रकार पुन्हा एकदा दिसून आला. भाजपनं चक्क एमआयएमसोबत हातमिळवणी केली.

नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच 2 स्वीकृत नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपनं एमआयएमची मदत घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही स्वीकृत नगरसेवक आपलेच निवडून यावेत यासाठी भाजपचे चक्क दोन गटांची नोंदणी केलीय. 

भाजपची ही चाल यशस्वी ठरली. इंदुबाई मिसाळ उपनगराध्यक्षपदी तर चंद्रशेखर पालकर आणि आसेफ पटेल स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान, दोन गटांची नोंदणी करण्याच्या भाजपच्या चालीला विरोधकांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलंय.