भोपाळ | पाऊस पडावा यासाठी मध्य प्रदेशमधील छत्तरपूरमध्ये चक्क बेडकांचं लग्न लावण्यात आलं. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला भाजपच्या बाल विकास राज्यमंत्री ललिता यादव उपस्थित होते.
महाराष्ट्रासह देशभरात पाऊस पडावा यासाठी विविध प्राण्यांची लग्न लावण्याची प्रथा आहे. तशीच छत्तरपूरमध्ये बेडकांचं लग्न लावण्याची प्रथा आहे. इंद्र देवाला खूश करण्यासाठी हे लग्न लावण्यात येतं.
लग्न लावल्याने दुष्काळ पडत नाही, अशी या गावातील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या लग्नाला भाजपच्या नेत्यांनी लावलेली हजेरी मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’
-पाकिस्तानचा हा खेळाडू गांजाडा!!! अंमली पदार्थ चाचणीत दोषी
-…. अन् सरणावर ठेवलेली व्यक्ती चक्क उठून पाणी प्यायली!
-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल
-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!