देश

“राहुल गांधी यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही”

नवी दिल्ली | केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांचं तर त्यांचे मुख्यमंत्रीदेखील ऐकत नाहीत. याचा अर्थ असा की एकतर त्यांच्या वक्तव्यांमध्ये वजन नाही किंवा त्यांचे मुख्यमंत्री त्यांना गंभीरतेनं घेत नाहीत, असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

सद्य परिस्थितीत आपण एकत्रित आहोत हे दाखवण्याची आहे. राजकारण हे नंतरही केलं जाऊ शकतं. राहुल गांधी लॉकडाउनचा विरोध केला. तसंच डॉक्टर्स, कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यासाठी थाळी आणि टाळ्या वाजवण्याचाही विरोध केला. देशात अनेकांनी दिवे लावण्याचा संकल्पही केला होता, त्यालाही त्यांनी विरोध केला, असं रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्वात पहिले पंजाबमध्ये कर्फ्यू लावला, लॉकडाउनही जाहीर केला. राजस्थाननंदेखील हेच केलं. महाराष्ट्रातही हे झालं की नाही?, असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

दरम्यान, सरकार मजुरांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना होणारा त्रास पाहून आम्ही देखील दु:खी आहोत, असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुणे महापौरांच्या पायाला भिंगरी, कंटेन्मेंट भागात प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचे नियोजन!

…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

महत्वाच्या बातम्या-

उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांना…-देवेंद्र फडणवीस

वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत

‘…हे पत्र एकदा नक्की वाचाच’; प्रियंका गांधींची नरेंद्र मोदींना विनंती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या