जयपूर | राजस्थानधील सीकर या भागात कल्याण कॉलेजसमोर पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील चिमुरचे भाजपचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती आहे.
सीकर भागातील कल्याण कॉलेजसमोर नो एन्ट्रीमध्ये बस घुसवल्याने आमदार कीर्ति कुमार यांच्या बसला वाहतूक पोलिसांनी अडवलं. त्यानंतर तेथील वाहतूक पोलिसांनी चलन फाडलं आणि कागदपत्र मागितली. मात्र यामुळे कीर्ति कुमार भडकले आणि त्यांनी युनिफॉर्म फाडला आणि मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.
त्यासोबतच त्यांनी ड्यूटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वागणूक आणि त्यांना अभद्र शब्दांचा वापर केल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनीच आम्हाला माराहाण केल्याचा आरोप कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी केला आहे. यासंबंधी कीर्ति कुमार यांच्या वडिलांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, आम्ही ज्या मार्गाने चाललो होतो तिथे कुठेही वनवे चा बोर्ड नव्हता. त्यामुळे नो एन्ट्री असल्याचं आमच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी अरेरावीची भाषा करू लागले महत्वाचं म्हणजे त्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने माझीच कॉलर पकडल्याचा आरोप कीर्ति कुमारच्या वडिलांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार
मारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका
…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर