महाराष्ट्र मुंबई

भाजपचं ‘राज’कारण, आशिष शेलार-राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक!

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने नवी खेळी खेळली आहे. आज राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

ही बैठक जवळपास दोन तास झाल्याची सुत्रांची माहिती आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यातचं आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून युतीसाठी  शिवसेनेऐवजी आता अन्य पर्यायांचा विचार केला जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेची साथ सोडून ‘मनसे’सोबत जाणार का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

-“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

-नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

-“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या