बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वदेशी भोगी विपत्ति, सांगे वडिलांची कीर्ती- अतुल भातखळकर

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘वनजीव सप्ताह 2021’ चा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील ‘वन्यजीव वाईल्ड महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्र्यामुळेच राज्याच्या वन विभागाचं वजन वाढलंय असं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ति, सांगे वडिलांची कीर्ती, तो येक??, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली. वन्यजीव सप्ताह सोहळ्या दरम्यान महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचे देखील सादरीकरण करण्यात आलं.

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर रोजी पक्षी संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात 50 अभयारण्य त्याचबरोबर 15 संवर्धन राखीव अभयारण्य राखीव करण्याचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20 टक्के वनक्षेत्र असणार आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2017 आणि 2019 नुसार अनुक्रमे 82 चौ.किमी आणि 16 चौ.किमी ने वाढले असल्याचं वन्यजीव सप्ताह सोहळ्याच्या सादरीकरणात दाखवण्यात आलं.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More