बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?”

नवी दिल्ली | नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. किरीट सोमय्या यांनीही समीर वानखेडेंची बाजू सावरत या वादात उडी घेतली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भातखळकर यांनी ट्विट करत अतिशय कठोर शब्दात नवाब मलिक आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. “ठाकरे सरकारचा एक मंत्री ड्रग्ज माफियांची सुपारी घेतो आणि शिवसेना त्याचे निर्लज्जपणे  समर्थन करते. तीही एका मराठी अधिकाऱ्याच्या विरोधात. इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली”, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी आघाडी सरकारवर टीका करणारी अनेक ट्विट केली आहेत. यामध्ये त्यांनी सामनाचा आग्रलेख, सचिन वाझे प्रकरण, नवाब मलिक अशा अनेक मुद्द्यांवरून आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये,”शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग माफियांवरून ओवाळून टाकलेली दिसते”, अशी टिका केली आहे.

दरम्यान, समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. या आरोपांवर कायदेशीर उत्तर देणार असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळत चालल्याचं दिसत आहे. आता याप्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात  बातम्या-

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय?

देशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार?, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More