बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दारूप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती”

मुंबई |  कोरोनाच्या काळात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र आता टाळेबंदी शिथील होत असताना मंदिरं उघडली जावीत, अशी मागणी होऊ लागलेली आहे. विरोधी पक्ष भाजपने या मागणीला जोर लावला आहे मात्र शासन याविषयी सावध पाऊले उचलताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दारूप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर सरकारने दारं उघडली असती, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती. मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय?, अशा शब्दात भातखळकर यांनी राज्य सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

टाळेबंदीची शिथीलता होत असताना बससेवा, मेट्रो, शॉपिंग मॉल सुरू झाले आहेत. मग नागरिकांच्या श्रद्धेसाठी मंदिरं उघडायला काय हरकत आहे? सोशल डिस्टन्सिंग पाळून लोक दर्शन घेतील, असं भातखळकर म्हणाले आहेत.

कोरोनाबाबत उपचार करण्यासाठी राज्यातील खाजगी रुग्णालयातील खाटा राज्य सरकारने ताब्यात घेणे आणि उपचाराचे दर नियंत्रित ठेवण्याविषयीचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलण्याचं आवाहन भातखळकर यांनी केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना 1 रूपयांचा दंड, रक्कम न भरल्यास…..

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला 3 लाखांहून अधिक डिसलाईक

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने, खासदार कोल्हेंचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More