“वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतीये अन् चिरंजीवांना दिल्लीची स्वप्न पडतायत”
मुंबई | 2024 मध्ये शिवसेना दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच या वक्तव्याचा पुनरूच्चार पर्यटनमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावरून टीकेची झोड उठवली आहे.
महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. मुंबईचं महत्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. मात्र, 2024मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसेल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय आणि चिरंजीवांना दिल्लीची स्वप्न पडतायत, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे. तर महाराष्ट्रात यांचे 56 आमदार आहेत, असा टोला देखील भातखळकर यांनी लगावला आहे. भातखळकरांनी ट्विट करत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका केली. घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतोय, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला होता.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय, चिरंजीव दिल्लीची स्वप्न पडतायत. महाराष्ट्रात यांचे ५६ आमदार आहेत. https://t.co/mD9D3O1uUE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 27, 2022
थोडक्यात बातम्या-
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मोठी बातमी! संभाजीराजेंची प्रकृती ढासळली, तरीही औषधं घ्यायला नकार
थायरॉईड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ ज्यूस ठरतील फायदेशीर
“माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी हे उपोषण थांबणं गरजेचं”
“घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो”
Comments are closed.