“राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचं नाव डांबराने लिहिलं जाईल”
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरल्याचं पाहायला मिळालं. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी सरकारला घेरलं. तर राज्यपालांनी शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं. ते पिल्लू वळवळ करत होतं. आता आमच्यावरच फुत्कारत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बाळासाहेबांनी भाजप आणि शिवसेनेची युती केली होती. त्यामुळे सापाशी युती बाळासाहेबांनी केली का? हे सांगाव, असा प्रश्न भातखळकर यांनी भाजप-सेनेच्या युतीबद्दल बोलताना उपस्थित केला आहे. तर राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांचं नाव सुवर्ण अक्षराने नाही तर डांबराने लिहिलं जाईल, असा घणाघात भातखळकरांनी केला.
दरम्यान, अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या घोषणेबाजीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण अर्ध्यावर सोडलं आणि निघून गेले. राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीत आमदार आक्रमक झाले आहेत तर भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच मलिकांविरोधात घोषणाबाजी केली.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
मविआच्या आमदाराचं ‘खाली डोकं वर पाय’, अभिभाषण अर्ध्यावर सोडून राज्यपाल माघारी
“अटकेत असलेला मंत्री मंत्रिपदावर कसा?, बाळासाहेब असते तर…”
‘नवाब मलिक हाय हाय’, अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधक आक्रमक
मोदी व पुतिन यांच्यात दुसऱ्यांदा चर्चा, युक्रेनमधील भारतीयांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.