बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच”

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे देखील तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यामुळे अख्तर यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. अशातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.

जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग मात्र कट्टरवादीच आहे. त्यांचे वक्तव्य केवळ बेशरमपणा आहे. तुम्ही बहूसंख्य हिंदू समाज असलेल्या देशात राहून तालिबानवर टीका करत आहेत. जावेद अख्तर यांच्यात हिंमत असेल तर ताालिबानमध्ये जाऊन टीका करा. तसेच केलेलं वक्तव्य मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागा, नाहीतर तुमच्या विरोधात बदनामीचा खटला केला जाईल, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर  हल्ला करून अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही काम ही तालिबानसारखेच आहे. त्यामुळे त्यांच्या या कामात भारतीय संविधान आडवे येत आहे, नाहीतर त्यांना संधी मिळाली तर तेही अशा पद्धतीचं क्रूत्य करतील, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, तालिबानचं समर्थन करणाऱ्यांचं वक्तव्य माझ्या लक्षात नाही. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचं त्यांनी समर्थन केलं आहे. समर्थन करणारे देशात काही मोजकेच मुसलमान आहेत असं देखील जावेद अख्तर म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या-

‘ओबीसी आणि भटके विमुक्तांनी तुमचं काय घोडं मारलंय?’, पडळकरांचा हल्लाबोल; पाहा व्हिडीओ

दररोज गोमूत्र पिल्यामुळे मी कोरोनापासून बचावले – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! कोरोनानंतर ‘या’ दोन साथीचं थैमान

‘…तर नियम पुन्हा कठोर केले जातील’; विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More