बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख आता मिस्टर इंडिया झालेत”

मुंबई |  गेल्या काही दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत ईडीने काटोल आणि वडविहिरा येथील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. तर ईडीने अनिल देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे सचिव पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख ‘नाॅट रिचेबल’ असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावर आता भाजपने टीका केली आहे.

ईडीच्या ससेमिरामुळे अनिल देशमुख गायब झाल्याची माहिती समोर आल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर खोचक टीका केली आहे. ही ईडीची जादू आहे, की मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख Mr. इंडिया झालेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्याच बरोबर त्यांनी अनिल देशमुखांचं कार्टुन देखील शेअर केलंय.

मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने त्यांना 3 वेळा समन्स बजावलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांनी थेट दिल्ली गाठत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर ईडीने देशमुख यांची संपत्ती जप्त केली. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा सलिल देशमुख देखील ईडीच्या रडारवर आहे.

दरम्यान, म्हाडाच्या पुनर्विकसित इमारतीतील सदनिकेच्या घोटाळ्यावर देखील अतुल भातखळकर यांनी भाष्य केलंय. सदनिका ताब्यात येण्याआधीच त्याचे वितरण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. राजकीय वरदहस्ताशिवाय असे घोटाळे होऊच शकत नाहीत. महाविकास आघाडी सरकार म्हणजे खंडणी आणि घोटाळा, ज्यामध्ये सरकारच सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पाहा ट्विट- 

 

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचं आता लय टेंशन घेऊ नका, कारण…

गंदी बात!, ‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा!

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं आता काही खरं नाही; होऊ शकते ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

“बा विठ्ठला…. जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे”

“उठा उठा आषाढी आली, स्वबळावर गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More