Top News महाराष्ट्र मुंबई

“…हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रू काढणं हे अजित पवार सांगू शकतात”

मुंबई | कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. याचाच धागा पकडत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही. हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे की अब्रू काढणं आहे. हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यांनी संजय राऊत यांच्याकडून धडे घेतलेले दिसत आहेत, असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नसल्याचं अजित पवार त्यावेळी बोलताना म्हणाले होते.

दरम्यान, अतुल भातखळकरांच्या या टीकेवर अजित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा डंका, सतीश चव्हाणांची हॅट्रीक

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपला धक्का; महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

‘कांदळवन जमिनीवरील हरकती-दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा’; आदित्य ठाकरेंचे आदेश

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा- अर्णब गोस्वामी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या