बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?’; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पवारांवर निशाणा

मुंबई |  राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाना पटोले म्हणतात महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचेच नाही तर राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत?, असे नानांना सुचवायचे आहे का?, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरातील कडी बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झाला आहे, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले स्वबळाचा नारा देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका करणारी वक्तव्य करत आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्ष 2024 मध्ये स्वबळावर आपली सत्ता महाराष्ट्रात आणेल, असंं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. 2014च्या धर्तीवर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, कोणताही धोका नको म्हणूनच स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं नानांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला झाली कोरोनाची लागण

करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

“मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाबद्दल अ‍ॅलर्जी, भाजप देशाचा चेहरा बिघडवत आहे”

‘…अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही’

आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारनं कृषी विधेयक मागे घ्यावं-राजू शेट्टी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More