Top News महाराष्ट्र मुंबई

‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा

मुंबई | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे यवतमाळचे विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख नेते संतोष ढवळे यांनी केलेल्या घोषणेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

रावसाहेब दानवेंची जीभ कापण्याऱ्याला दहा लाखांचं रोख बक्षीस, यवतमाळच्या शिवसेना नेत्याने दिलेली ही गंभीर धमकी महाराष्ट्राचे गृहमंत्री ऐकत असावेत अशी आशा करूया, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?, असंही भातखळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भातखळकरांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.  दिल्लीत सुरू असलेल्या शेतरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानाचा हात असल्याचं दानवे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान,  रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणी संतोष ढवळे यांनी केली होती.

 

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांचा अवमान करणारे दानवे हे येडपट आणि भैताड- विजय वडेट्टीवार

‘जेव्हा एका स्त्रीचे…’; अमृता फडणवीसांनी सांगितलं त्या ट्रोल होण्याचं कारण

नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल- संजय राऊत

“…म्हणून शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, अशी माझी मनापासून इच्छा”

“रावसाहेब दानवेंची जीभ कापण्याऱ्याला दहा लाखांचं रोख बक्षीस”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या