बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?’, भाजपचा शरद पवारांना सवाल

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून भाजपला लक्ष्य केलं. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता संजय राऊतांवर कारवाई. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.

शिंदे गट आणि भाजपच्या नवनिर्वाचित सरकावरूनही पवारांनी टीका केली. सत्ता नव्हती तिथे सत्ता आणली, असा टोला शरद पवारांनी लगावला. तर पवारांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जिथं सत्ता नव्हती तिथं आणली गेली इति शरद पवार. हेच तुम्ही तीन महिन्यांपूर्वीपर्यंत गेली अडीच वर्षे अभिमानाने सांगत होतात. आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?, असा खोचक सवाल अतुल भातखळकरांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More