बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला वाटत होते की बाळासाहेब ठाकरे हे संजय राऊतांचे गुरु, पण खरे गुरु शरद पवारच”

मुंबई | अधिवेशनात निंलबन करण्यात आल्याप्रकरणी 12 खासदारांनी आंदोलन पुकराले होते. यावेळी या खासदारांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊतांनी भेट घेतली होती. या भेटीवरून विरोधकांनी संजय राऊतांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

निंलबीत खासदार संसदेच्या आवारात गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी संजय राऊतांनी या खासदारांची भेट घेतली होती. नंतर शरद पवार खासदारांच्या भेटीसाठी आल्यानंतर राऊतांनी त्यांना स्वत: पुढे होत बसायला खुर्ची दिली होती. यावरूनच भातखळकरांनी संजय राऊतांवर ट्विट करून बोचऱ्या शब्दात टीका केली आहे,.

भातखळकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी शरद पवार गेले. तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरु असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा, असं सुनावत पुढे आम्हाला उगीच वाटत होते की बाळासाहेब ठाकरे संजय राऊतांचे गुरु आहेत. पण खरे गुरु तर शरद पवारच आहेत, असा खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनीही संजय राऊतांवर ट्विटरवरून टीका केली होती. संजय राऊत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो शेअर करत निलेश राणेंनी खोचक शब्दात टोला लगावला होता. “पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा कामगार प्रमुख” अशा शब्दात निलेश राणेंनी संजय राऊतांवर घणाघात केला होता.

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More