बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अभिनेता आमिर खानने हिंदूच्या भावना दुखावल्या”

नवी दिल्ली | अभिनेता शाहरूख खानच्या मुलावरून वाद पेटलेला असतानाच तिकडे कर्नाटकचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी आता आमिर खानला लक्ष केलं आहे. त्यांनी आमिर खानने केलेल्या एका जाहिरातीवरून कंपनीला पत्र लिहीत अमिरने हिंदूच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं आहे.

आमिर खानने सीएट कंपनीच्या टायरची जाहिरात केली होती. ज्यामध्ये त्याने दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचे आवाहन केलं आहे. त्यावरूनच हेगडे यांनी कंपनीला पत्र लिहीत आमिरच्या आवाहनावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय त्यांनी पत्रात इतरही काही मुद्द्यावरून आमिरला लक्ष्य केलं आहे.

त्यांनी पत्रात लिहील आहे, आमिर खानने सामाजिक प्रश्नांवर दिलेल्या संदेशाचं स्वागत आहे. परतुं यामुळे हिंदूच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. याशिवाय ते म्हणाले, शुक्रवारी आणि महत्त्वाच्या सणांना मुस्लिम समुदायाकडून रस्ता आडवला जातो. त्यावेळी रुग्णवाहिकेसह अन्य वाहनेही अडवली जातात. यामुळेही नुकसान होतं, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे आमिरला टोला लगावला आहे.

हेगडे यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे, अनेक शतकांपासून हिंदूविरोधी भेदभावाविषयी तुम्ही जागरूक असाल अशी मला अपेक्षा आहे. आजकाल काही हिंदूविरोधी अभिनेत्यांकडून हिंदूच्या भावना दुखावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तेेे स्वत:च्या समुदायातील चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रयत्न करत नाहित. याआधी अनेकवेळा अभिनेत्यांनी केलेल्या जाहिरातींवरून किंवा वक्तव्यावरून असे वाद पेटलेले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More