भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले
आग्रा | अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका भाजप आमदाराने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली आहे. त्याच बरोबर येत्या काही दिवसात ताजमहालचं नाव राममहाल करण्यात येेईल असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशच्या बैरीया मतदार संघातील आमदार सुरेंद्र सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना योगी आदित्यनाथ यांच्याशी केली आहे. शिवाजीचे वंशज उत्तर प्रदेशच्या भुमीत अवतरले आहेत. समर्थ रामदासांनी ज्याप्रमाणे भारताला शिवाजी दिला त्याप्रमाणे गोरखनाथजींनी उत्तर प्रदेशाला योगी आदित्यानाथ दिला, असं भाजप आमदार म्हणाले.
त्याचबरोबर, ताजमहालचं नाव राममहाल करण्यात येणार आहे, ताज महालाच्या जागी आधी तिथं शंकराचं मंदिर होतं, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. तर योगी आदित्यानाथ यांच्या कार्यकाळातच हे काम पुर्ण होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर ताजमहालचं नाव कृष्णमहाल किंवा राममहाल करण्यात यावा अशी जाहीर मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपुर्वी हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी ताजमहाल मध्ये प्रार्थना म्हणायला लावली होती. त्यानंतर या प्ररकणात पोलिस कारवाई देखील झाली होती. याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात होता.
थोडक्यात बातम्या-
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक
पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!
‘या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप
बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड
काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.