देश

खळबळजनक! भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

हेमताबाद | भाजप आमदार देवेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह त्यांच्याच गावात दोरीच्या सहाय्याने लटकलेला आढळला आहे. पश्चिम बंगालमधील दिनाजपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र भाजप नेत्यांकडून आता राॅय यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

देवेंद्र रॉय यांनी गेल्या वर्षी सीपीएममधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. उत्तर दिनाजपूरची राखीव जागा देवेंद्र यांना देण्यात आली.

राॅय यांचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला असला, तरी स्थानिक नागरीक व शहरातील भाजप नेते हा नियोजनबद्ध खून असल्याचा आरोप आता करत आहेत. हेमताबादच्या या घटनेमुळे मात्र शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

 

दरम्यान, राॅय यांची हत्या झाली की आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला असून अ्ज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…

सचिन पायलट यांनी भूमिका बदलली; भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत!

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

पुण्यात 21 वर्षीय तरुणाच्या खुनाचा थरार; रस्त्यात गाठून गोळीबार त्यानंतर कोयत्याने सपासप वार

सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या