जनतेने वसुंधरा आणि मोदींना धडा शिकवला- भाजप आमदार

जयपूर | राजस्थानच्या पोटनिवडणुकीत सुफडा साफ झालेल्या भाजपवर आता स्वपक्षीयांनीच टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केलीय. जनतेने वसुंधरा आणि मोदींना धडा शिकवला, असं भाजप आमदार घनश्याम तिवारी यांनी म्हटलंय. 

वसुंधराराजे सरकारला हटवण्याआधी नागरिकांनी मोदी सरकारला वेकअप कॉल दिला आहे. राजेंची मनमानी संपवा नाहीतर आगामी काळात भाजपला सत्ता गमवावी लागेल, असं तिवारी यांनी म्हटलंय. तसेच पोटनिवडणुकीत देण्यात आलेले उमेदवार वसुंधराराजेंच्या मर्जीतील होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, 2 लोकसभा आणि एका विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. तिन्ही जागा काँग्रेसने भाजपकडून हिरावून घेतल्या.