बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी भांडणं लावून लोकांची घरं फोडली, त्यांच्या घरात आता टोकाची भाडणं”

पंढरपूर | भाजप आणि राष्ट्रवादीने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी दंड थोपटले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते जोरदार प्रचारसभा घेत आहेत. यातच आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी चढत आहेत. यातच ज्यांनी घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्याच शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत, अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. नियतीचा न्याय देखील इथेच पाहायला मिळतो, असा टोला देखील त्यांनी शरद पवारांनी लगावला आहे.

मेंढ्यांचे नेतृत्व कधी लांडग्याकडे नसतं. आजवर राष्ट्रवादीने गोरगरीब बहुजन समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला आहे. राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळेच नेहमी राष्ट्रवादी गरीब गृहमंत्री शोधतात. ज्यामुळे चिल्लर गृहमंत्र्याला आणि नोटा मात्र बारामतीला जावी अशी व्यवस्था असल्याचं पडळकरांनी सांगितलंय.

सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते. मात्र शेवटी गृहमंत्रीपद गरीब अशा वळसे पाटील यांच्याकडे दिलं गेलं, असं पडळकर म्हणाले. तर तुमच्या 35 गावाला पाणी न देण्याचं कारण देखील तसंच होतं. जर तुम्हाला पाणी दिलं असतं तर यांचा ऊस कुणी तोडला असता?, असा सवाल पडळकरांनी विचारला.

दरम्यान, राज्यात सीबीआयला येऊ देणार नाही म्हणणारे माजी गृहमंत्री आता त्यांच्याच चौकशीला सामोरे जात आहेत, असा टोला पडळकर यांनी अनिल देशमुख यांना लगावला. तर याआधी अजित पवार यांचं बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे, अशी बोचरी टीका पडळकरांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी धडकी भरवणारी

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?; समोर आली ही धक्कादायक माहिती

‘…तर पुण्यातील अत्यावश्यक दुकानंही बंद करा’; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

“लोकांनी ऐकलं आहे, आता विरोधी पक्षानेही 1 मेपर्यंत घरीच बसावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More