बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार खुर्ची बचाव कार्यात व्यस्त आहे”

मुंबई | महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील जनता आस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झाली आहे. आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आस्मानी आणि कोरोनाच्या संकटाने मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांना व सामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी 1 लाख रूपयाची मदत केली पाहिजे. शिवाय व्यापाऱ्यांना वर्षभरासाठी भाडेपट्टी आणि वीजबील माफीची मदत जाहीर करून लवकरात लवकर अंमलात आणावी, अशी मागणी देखील पडळकरांनी केली आहे.

कर्जबुडव्या साखर कारखान्यांना 3800 कोटी देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते. त्याचप्रमाणे फडणवीस सरकारने केलेल्या मदतीप्रमाणे हे सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का करत नाही?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More