बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला…”, गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

मुंबई | एसटी आंदोलनाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. सरकारने कारवाईचा बडगा उचलल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. आता एसटी कर्माचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला 6 जिल्ह्यातून हद्दापारीची नोटीस देखील पाठवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पडळकर म्हणाले, अनिल परब यांनी स्वत:चं अपयश झाकण्यासाठी माझ्यावर, सदाभाऊंवर एसटी कर्मचाऱ्यांचे डोके भडकावत असल्याचा आरोप वारंवार केला. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्या नंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरले आहेत. ते आता मुघलशाही पद्धतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर आरोप लगावला आहे. ते म्हणाले, माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या मोठ्या भावाला बेकायदेशीरपणे 4 जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस पाठवली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, अनिल परब यांनी राज्यातील एकूण 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सरकार या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे. पण कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं सांगितलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या 50 टक्के क्षमता भरली की त्या डेपोतील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“उघड दार देव आता उघड दार देव”, सदाभाऊ खोत यांचं जोरदार प्रत्युत्तर

“खलिस्तानी म्हटलं, बदनाम केलं गेलं, सरकारनं आडमुठेपणा केला म्हणून…”

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

“महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More