बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर |  भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समजत आहे. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली असून त्याच्याबाबत कोंणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

गोपीचंद पडळकरांनी राजकीय नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानेे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या दगडफेकीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही मात्र पडळकरांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.

सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू आहेत. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नसल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही. गाडीच्या पुढे मोठा दगड करण्यात आला. गाडीची काच फुटली असल्याचंही पडळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“अमित शहा चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे माहित नाही”

धक्कादायक! बुलडाण्यातील रूग्णालयात एकाच कोरोना रुग्णाला दिले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेसोबत अफेअरच्या चर्चांवर अलायानं केला खुलासा, म्हणाली….

“होय, मी धमकी देतोय! भाजप नेते मंचावर आले तर एक एकाचे बक्कल्स काढले जातील”

चिंताजनक! डेल्टा प्लसनंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय ‘हा’ नवा धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More