Dheeraj Ailani passes away l उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे (Ulhasnagar Assembly Constituency) भाजप आमदार (BJP MLA) कुमार आयलानी (Kumar Ailani) यांचे सुपुत्र धीरज आयलानी (Dheeraj Ailani) यांचे आज निधन झाले. ते प्रख्यात उद्योजक (Businessman) होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) एका रुग्णालयात (Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती आयलानी कुटुंबाच्या (Ailani Family) निकटवर्तीयांनी दिली. धीरज आयलानी यांच्या निधनामुळे आयलानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धीरज आयलानी यांचा राजकीय प्रवास :
कुमार आयलानी यांच्या राजकीय कारकिर्दीत (Political Career) धीरज यांचा मोठा वाटा होता. ते समाजसेवेसाठी (Social Service) सतत तत्पर असणारे उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
कुमार आयलानी यांचा परिचय :
कुमार आयलानी हे भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior Leader) असून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदारपदी (MLA) निवडून आले आहेत. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकी भूषवली. २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. मात्र, २०१९ आणि २०२४ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर (Lotus Symbol) आमदारपदी निवडून आले आहेत.
Dheeraj Ailani passes away l आमदार गायकवाड यांच्याकडून श्रद्धांजली :
भाजपच्या कल्याण (Kalyan) मतदारसंघाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड (Sulabha Ganpat Gaikwad) यांनी धीरज आयलानी यांना श्रद्धांजली (Tribute) अर्पण केली आहे. “धीरज आयलानी यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने मन हेलावून गेले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचाच नव्हे, तर समाजाचाही मोठा तोटा झाला आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
News Title: BJP MLA Kumar Ailani’s son Dheeraj Ailani passes away
महत्वाच्या बातम्या-
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ खायलाच हवेत
हल्ल्यानंतरही धाडसी सैफने दाखवलं शौर्य, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
आणखी एका भयंकर अपघाताने पुणे हादरलं, 9 जणांचा मृत्यू
Artificial Intelligence मध्ये करिअर करायचंय?, ही बातमी वाचाच
पैसे झाले डबल, ‘या’ शेअरने दिली छप्परफाड कमाई