श्रीनगर | पत्रकारांनो… स्वतःला वेळीच सुधारा. अन्यथा तुमचाही ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी करून टाकू, अशी धमकी जम्मू-कश्मीरमधील भाजपचे आमदार चौधरी लालसिंग यांनी दिली आहे.
आपला सुद्धा ‘शुजात बुखारी’ व्हावा असेच पत्रकारांना वाटते काय? वागायचे कसे यासाठी पत्रकारांनी स्वतः लक्ष्मणरेषा आखून घ्यावी, असं चौधरी म्हणाले.
दरम्यान, कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींचं समर्थन करणाऱ्या मोर्चामध्ये चौधरी सहभागी झाले होते. त्यावर विरोधातील बातम्यांमुळे वातावरण एवढे तापले होते की त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. तेव्हापासून ते पत्रकारांवर चिडलेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-मनसेची ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी; वाचा नेमकं लिहिलंय काय….
-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट
-भाजप आणि संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज मोठी घोषणा करणार
-तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या
-साधा एक गोल करता येईना आणि म्हणे काश्मीर पाहिजे!