मुंबई | पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनविरोधात यासाठी मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं आहे. मनसेच्या या महामोर्चासाठी राज्यभरातून मनसेेचे कार्यकर्ते आहेत.
मनसेचे पुण्यातील कार्यकर्तेही मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील कार्यकर्त्यांसाठी ज्या बसचा वापर केला जाणार आहे. त्या बस भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या असल्याचं दिसत आहे.
या बसेसवर महेश लांडगे यांचं नाव दिसत आहे. तसेच कार्यकर्त्यांसोबत भाजपचेही काही कार्यकर्ते आहेत अशी माहिती समजत आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली 14 वर्ष मनसे कुठे होती?, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“…तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावं”
“हे ट्विट संभाळून ठेवा; भाजप दिल्लीत इतक्या जागा मिळवून सरकार स्थापन करणार”
महत्वाच्या बातम्या-
मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात; शिवसेनेचा आरोप
ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं- देवेंद्र फडणवीस
देशाचं आणि हिंदुंचं भाग्य एकच- भैयाजी जोशी
Comments are closed.