बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोथरुडमधून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट???, ‘या’ नेत्याला तिकीट मिळण्याची शक्यता!

मुंबई | पुण्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या कोथरुडमधून भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळणार असल्याचं कळतंय.

कोथरुडची जागा शिवसेनेकडे होती, मात्र २०१४ च्या निवडणुकीत वेगवेगळे लढल्यामुळे सेनेनं ही जागा गमावली. आता ही जागा पुन्हा मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे, मात्र भाजप याठिकाणी वेगळीच खेळी खेळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कामाचा झपाटा, मतदारसंघाची बांधणी आणि जनसंपर्क चांगला असला तरी मेधा कुलकर्णी यांच्यावर भाजपचं नेतृत्व नाराज असल्याचं कळतंय. त्यातच चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मेधा कुलकर्णींचा पत्ता शंभर टक्के कट होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोथरुड पुन्हा राखण्यासाठी भाजपला इलेक्टिव्ह मेरिट हवं आहे. भाजपचं नेतृत्व ते मुरलीधर मोहोळ यांच्यात पाहात असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-…तर मी शिवसेनेची हमी मी घेतो- रावसाहेब दानवे

-या भाजप आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

-“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का???”

-गाफील अधिकाऱ्यांवर 3 दिवसात कारवाई करणार- गिरीश महाजन

-राज ठाकरेंच्या वक्तव्याशी नारायण राणे सहमत?; म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More