बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल!

अंबाजोगाई | बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अंबाजोगाई शहरातील रस्त्याच्या कामावरून मागील दोन महिन्यांपूर्वी प्रकार घडला होता. पण अक्षय मुंदडा यांची दोन महिन्यांपूर्वीची ऑडियो क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळं आता अक्षय मुंदडांनी पोलिसांत रितसर तक्रार केली आहे..

अक्षय मुंदडा हे राज्याच्या माजी दिवगंत मंत्री विमल मुंदडा यांचे सुपुत्र आहेत. अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा या केज मतदारसंघाच्या आमदार आहेत. अक्षय मुंदडांनी आपल्या तक्रारीमध्ये लिहीलं आहे की, ऋषीकेश अण्णासाहेब लोमटेने फोन करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या फोन कॉलची ऑडियो क्लिप आता दोन महिन्यानंतर व्हायरल झाली आहे.

अक्षय मुंदडांच्या फिर्यादीनुसार अंबाजोगाई पोलीस ठाण्यात कलम 500, 504, 506 अन्वये ऋषीकेश लोमटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश लोमटेने मागील दोन महिन्यापूर्वी देवस्थानच्या रस्त्याच्या कामासंदर्भात फोन केला होता. लोमटेने रस्ताचे काम करू देण्याची मागणी केली होती.

दरम्यान, ऋषिकेश लोमटेच्या म्हणण्यानुसार आपण रस्त्याच्या काम अक्षय मुंदडा यांच्याच हस्ते उद्घाटन करणार असल्याचं या ऑडियो क्लिपमध्ये म्हटलं आहे. मुंदडा यांना बोलूनही न ऐकल्यानं ऋषिकेश लोमटेने रागाच्या भरात अक्षय मुंदडांना शिवीगाळ सुरू केली. तसेच आपल्या भागात आलात तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ती ऑडियो व्हायरल क्लिप आता व्हायरल झाल्यानं अक्षय मुंदडांनी कायदेशीर मार्ग पत्कारत गुन्हा नोंदवला.

थोडक्यात बातम्या –

किंग खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर #SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड!

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

राष्ट्रवादीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर इतर कोणाचाही त्याला…- रामदास आठवले

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More