बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तेव्हा अजित दादा आणि अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, तर आता…”

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसूली प्रकरणाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून 8 तास चौकशी करण्यात आली. त्यावेळी ईडीच्या कार्यालयात मी सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली आहेत, असं अनिल परब म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही चौकशीपूर्वी राजीनामा दिला होता. तर मग अनिल परब राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल नितेश राणे यांनी अनिल परब यांना विचारला आहे. संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. बाकी सगळे जण राजीनामा देणार आणि हे पदावर असताना चौकशीला सामोरे जाणार हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय नाही का?, असा सवाल देखील नितेश राणे यांनी विचारला आहे.

अनिल परब पदाचा राजीनामा का देत नाहीत? ते मंत्रिपदावर असताना त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांवर दबाब येत नाही का? जर त्यांचं मन स्वच्छ असेल, त्यांनी चूक केली नाही, तर त्यांनी स्वत: ला सिद्ध करावं, मातोश्री चे हे परिवार मंत्री आहेत, म्हणून यांना वेगळा न्याय आहे का?, असंही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर अनेक नेत्यांना ईडीची नोटीस देखील आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण या प्रकरणामुळे चांगलाचं तापलेलं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“मला पुन्हा नजरकैदेत ठेवलंय, मला बाहेर पडू दिलं जात नाही”

नेताजी पडले! भर कार्यक्रमात भाजप नेता स्टेजवरून कोसळला; पाहा व्हिडीओ

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा; सुप्रिया सुळेंकडून तोंडभरून कौतूक

मोदी सरकारची नवी घोषणा! सरकारी शाळेतील मुलांसाठी राबवणार ‘ही’ खास योजना

“आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर कारवाई करणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More