बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

मुंबई | राज्यात सध्या विविध प्रकरणांवरून सत्तधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद चालू आहे. एनसीबीची कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, आरक्षणाचा मुद्दा, निवडणुका या सर्व मुद्द्यांवरून भाजप नेते सत्ताधारी महाविकास आघाडीवर (MVA Sarkar) जहरी टीका करत आहेत. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारला धारेवर धरल आहे. गेल्या दोन वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली याचा खुलासा करावा असं आव्हान राणे यांनी ठाकरे यांना दिलं आहे. गेल्या दोन वर्षात मराठा समाजाच्या विकासासाठी सरकारनं काहीच केलं नसल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

मी आवर्जुन मराठा समाजाला सांगतो. गेली दोन वर्षात सरकारनं काय केलं आपल्यासाठी ते आठवा. सरकारला फक्त आर्यन खानची चिंता आहे. ना देशमुखांच्या पोरांची चिंता आहे. ना पाटलांच्या पोरांची चिंता या सरकारला आहे. परिणामी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असं म्हणतानाच राणे यांनी लवकरच आम्हाला 59 वा मराठा मोर्चा काढावा लागेलं, असं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात आपण जे 58 मोर्चे काढले तो काळ परत एकदा आठवा, असं आवाहन राणे यांनी मराठा बांधवांना उद्देशून केलं आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे याला आपण झुकवावं लागेल, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“राज्यातील रस्ते कतरिनाच्या गालासारखे गुळगुळीत असावेत”; राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

भारी काम झालं! रेशनधारक कुटुंबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

एसटीचं विलीनीकरण नाहीच, कर्मचाऱ्यांचं निलंबन मात्र तातडीने रद्द होणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More