नागपूर | भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भडकले असून फडणवीस सरकार लॉर्ड मेकॉलेचे शैक्षणिक धोरण राबवित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेस सरकारच्या विरोधात मराठी माध्यमांच्या शाळा वाचविण्यासाठी आम्ही लढलो होतो. भाजपने नेहमीच लॉर्ड मेकॉलेने रुजविलेल्या शिक्षण पद्धतीचा विरोध केला, परंतु सत्तेत आल्यानंतर काँग्रेस सरकारची धोरणे भाजपतर्फे राबविली जात आहेत असं ते म्हणाले.
येत्या पावसाळी अधिवेशनात आपण हा मुद्दा उचलून धरणार अाहे, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-योगा करता करता बहाद्दराने चोरला बल्ब- पहा व्डीडिओ
-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!
-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम
-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?
-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा