महाराष्ट्र मुंबई

प्लास्टिक बंदीला चक्क भाजप नेत्याचा विरोध; स्थगिती देण्याची मागणी

मुंबई | प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर आता या बंदीला स्थगिती मिळावी यासाठी चक्क भाजप आमदारानेच प्रयत्न सुरु केले आहेत. भाजप आमदार राज पुरोहित यांनी यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह राज पुरोहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी डिसेंबरपर्यंत प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची मागणी केली.

सत्ताधारी भाजपच्या आमदाराने आपल्याच सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. मतदारसंघातील व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा

-अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल

-कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!

-उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

-सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या