Top News महाराष्ट्र मुंबई

‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!

Photo Credit- Facebook | bjp

मुंबई | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेस ,राष्ट्रवादी, आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र  येत सत्ता स्थापन केली त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यानंतर वारंवार भाजप ठाकरे सरकार हे पडणार असल्याचा दावा करतं परंतू सरकारला एक वर्ष पुर्ण झालं आहे. अशातच भाजप आमदार राज पुरोहित यांनी महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रातील सरकार जाणार हे लिहून घ्या, असं राज पुरोहित यांनी म्हटलं आहे. लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुरोहित यांनी केंद्र सरकार फ्री झाले की म्हणजे नेमकं कधी याचा अर्थही सांगितला.

दिल्लीत चालू असलेलं शेतकरी आंदोलन, पश्चिम बंगालमधील निवडणूक यातून फ्री झालं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं पुरोहित म्हणाले. तर राज्य सरकारची कामगिरी समाधान कारक नाही हे सगळ्यांच दिसत आहे. लोकांनाही भाजपचंच सरकार हवंय. मुंबई महापालिकेत भाजप 121 जागा जिंकणार आणि भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही पुरोहित यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना फक्त सांगते पण त्यांच्यात हिंदुत्व वगैरे काही उरलेलं नाही. आता फक्त कमळ कमळ आणि फक्त कमळ, असंही पुरोहित यांनी म्हटलं आहे. मात्र एकीकडे भाजप सरकार पडण्याबाबत अशा प्रकरचे दावे करत असलं करत असलं तरी आणखी 25 वर्ष काही भाजप येत नसल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणत असतात.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई

रिहानाचा ‘हा’ टाॅपलेस फोटो पाहून राम कदम संतापले, म्हणाले…

“शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादीसाठी स्त्री-दाक्षिण्य केवळ भाषणात बोलायचे मुद्दे”

राज्यात पुन्हा लॉकडाऊन पडणार का?; राजेश टोपे म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या