बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या तीन पक्षांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापायी…’; राम कदमांचा हल्लाबोल

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवून दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यानी त्याच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं असल्याचा आरोप करण्यात आला. भाजप नेत्याच्या मुलाचं नाव यात समोर येत असल्याने भाजप अडचणीत सापडलं. त्यातच या हिंसाचाराचा एक व्हिडीओदेखील समोर आला.

लखीमपूर खीरी येथे झालेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदला हाक दिली आहे. महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्र बंदवरून भाजप आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. या तीन पक्षांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापायी जनतेच्या माथ्यावर हा बंद लादला असल्याचा आरोप राम कदमांनी केला आहे.

कोरोनाकाळात दीड वर्ष सगळं बंद होतं. आत्ताकुठे सगळं काही उघडलंय. लोकं अडचणीत आहेत, संघर्षात आहेत. आता या बंदमुळे गोरगरीबांचं जे नुकसान होणार ते तुम्ही तीन पक्ष भरून देणार का? ज्यांना बंदमध्ये सामील व्हायचं नाही त्यांचं काय? हे सरकार जर त्यांच्यावर जबरदस्ती करणार असेल तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, रस्त्यावर उतरू, असा घणाघात राम कदम यांनी केला आहे.

पालघर हत्याकांड, काश्मीरमध्ये 5 दिवसात 7 हिंदुंना ठार मारण्यात आलं, मुंबई आणि महाराष्ट्रात निर्भयासारख्या घटना सातत्याने घडत आहेत त्यावेळी तुम्हाला बंदची आठवण नाही का आली? असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तर आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करतो पण शेतकऱ्यांच्या अडून राज्यातले हे तिन्ही पक्ष यांनी राजकारण करण्याचं दु:साहस करू नये, असा इशाराही राम कदम यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशीही वाढ, वाचा आजचे ताजे दर

“भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र यांच्याशिवाय देशात कुणीही सुरक्षित नाही”

धोकादायक! जास्त फळं खाल्यानं ‘या’ अवयवांवर होऊ शकतो परिणाम

मोठी बातमी! महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील PMPML प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More