बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमच्यात जर ऐवढी हिंमत असेल तर स्वत:च्या…’; राम कदम आक्रमक

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरणी राज्यात राजकारण चांगलचं तापलेलं  आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्यावरून आता भाजपचे आमदार राम कदम यांनी नवाब मलिक यांना खुलं आवाहन केलं आहे.

‘महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे मंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ड्रग्ज माफियांचे समर्थन का करतायेत, अशी टीका राम कदम यांनी केली आहे. यावेळी राम कदम यांनी राज्य सरकार वसुली करत असल्याचा आरोप केला आहे.  वसूलीमध्ये बरबटलेले यांचे हात आणि काळवंडलेला यांचा भ्रष्टाचारी चेहरा आहे. यांनी सुरूवातीला समीर वानखेडे नंतर त्यांची पत्नी त्यांचे वडिल त्यांची बहिण यांना याच्यात ओढलं, असा म्हणतं राम कदम यांनी नवाब मलिक आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

त्याच्यानंतरही यांची नाव जेव्हा बोट यांची समुद्राच्या पाण्यात डुबते असं लक्षात आलं. त्यावेळेस यांची राजकीय आवश्यकता निर्माण झाली. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणि तेव्हड्यावर थांबले नाहीत त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचले, असा आरोपही राम कदम यांनी केला आहे.

दरम्यान, ऐवढी तर तुमच्यात हिंमत आहे तर स्वता:च्या जावयाची आणि जो तुमचा लाडका प्रभाकर आहे, ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलं आहे, जो गायब झालाय त्या दोघांची नार्कोटेस्ट का नाही करत? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. देशाला काय खरं काय खोटं काय येन केन प्रकारे ड्रग्ज माफियांना वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे तीन पक्ष का करताहेत? निश्चितपणे इथे कुठेतरी वेगळा वाझे लपलाय, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“हमाम में सब नंगे है कारण, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…”

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय- प्रविण दरेकर

’46 रेल्वेस्थानकावर बाँम्बस्फोट’; रेल्वे सुरक्षा दलाला आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

“एवढं गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More