Top News पुणे महाराष्ट्र

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नेतेमंडळींकडूनच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली

पुणे | भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा काल रविवारी पुण्यात पार पडला. या विवाहावेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. या लग्न सोहळ्याला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेककर आणि आमदार चंद्रकांता पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. मात्र या नेतेमंडळींनीच कोरोनाच्या नियमांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे.

लग्नामध्ये फोटोमध्ये दिसत आहे की नेत्यांनी मास्क लावलेले दिसत नाय्येत. यासंबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामध्ये सातपुतेंना शुभेच्छा देण्यात आल्या मात्र त्यानंतर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सामान्य लोकांनी मास्क नाही घातलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. मात्र आता नेत्यांनी जर असे नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई होणार की नाही?, असा सवाल सोशस माध्यमांवरून करण्यात येत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

…तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेवटचं आंदोलन करेल- अण्णा हजारे

“…तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल”

“वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच आहे, अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचं???”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या