महाराष्ट्र मुंबई

अपघातग्रस्त व्यक्तीला भाजप आमदार राम सातपुतेंचा मदतीचा हात!

मुंबई | भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी मरणाशी झुंज देणाऱ्या एका अपघातग्रस्ताला मदत केली. त्यांच्या या मदतीचं कौतूक होत आहे. रात्रीच्या वेळी त्यांनी स्वत: संबंधित अपघातग्रस्त व्यक्तीच्या छातीवर पंपिग करत त्याला मदत केली.

रात्रीची वेळ होती, राम सातपुते मुंबईवरून आपल्या मतदारसंघाकडे जात असताना त्यांना वाल्हे -नीरा दरम्यान पिसुरडी गेटजवळ गर्दी झालेली दिसत होती. काही वेळाने त्यांना समजलं की अपघात की अपघात झाला आहे. त्यानंतर राम सातपुते यांनी गाडी थांबवली.

राम सातपुते स्वत: अपघातग्रस्ताजवळ गेले आणि मरणाशी झुंज देणाऱ्या त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या छातीवर पंंपिंग करायला सुरूवात केली. यादरम्यान रूग्णवाहिकेला अपघाताची माहिती दिली.

रूग्णवाहिका येईपर्यंत राम सातपुते त्या व्यक्तीच्या छातीवर पंपिंग करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळाने तिथे रूग्णवाहिका आल्यावर अपघातग्रस्त व्यक्तीला उचलून रूग्णवाहिकेत झोपवले. त्यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले.  दरम्यान, राम सातपुतेंनी आपल्या या कृतीतून समाजसेवा, मानवता आणि संवेदनशीलतेचा संदेश दिला.

महत्वाच्या बातम्या-

विधान परिषदेचा पहिल्या निकालात भाजपची बाजी, अमरिश पटेल विजयी

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?; शरद पवार म्हणाले…

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

‘माफी मागा अन्यथा तोंड काळ करु’; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

2024 ला मी पुन्हा येईल- डोनाल्ट ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या