पुणे | भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा काल रविवारी पुण्यात पार पडला. या विवाहावेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. आता राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचं पाहायला मिळालं.
थोडक्यात बातम्या-
ब्रिटनहून भारतात आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह!
“मागे अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, अन् आता…”
“बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा, अन् तुम्ही त्याच बापाची चेष्टा करताय”
“आम्ही कुणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक”
“शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध”