ठाणे | शिवसेनेचं 2024चं लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना दिला होता. आदित्य ठाकरेंच्या सूचक इशाऱ्यानंतर भाजपने आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या सूचक वक्तव्यावरून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवलीत पर्यटणासाठी आले होते. त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला पाहिजे होता. मात्र, हल्ली त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडायला लागली आहेत, असा टोला रवींद्र चव्हाण यांनी लगावला आहे.
2024ला पुन्हा सत्तेत येणार त्यांचा हा जो म्हणण्याचा अर्थ होता, तो त्यांनी एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे असं मला वाटतं, अशी खोचक टीका रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारच्या काळात विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणं शक्य झाल्याचं आदित्य ठाकरे डोंबिवलीतील कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. तर 2024नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
तुम्हालाही ‘या’ चुकीच्या सवयी असतील तर आजच बंद करा, होऊ शकतात गंभीर आजार
…म्हणून विराटने दिलेलं ‘ते’ खास गिफ्ट सचिन तेंडुलकरने परत केलं
“मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल, तुम्हाला वाटत असेल…”
“षंढ सरकारची षंढ यंत्रणा, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”
“आमंत्रण नसताना बिर्याणी खायला जाऊन परराष्ट्रीय धोरण सुधारत नाही”
Comments are closed.