बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नौटंकी सुरू आहे’; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा | राज्यात आगामी काळात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयार करताना दिसत आहे. खासदार उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या कामाची पोस्टरबाजी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे.

उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्ष साताराची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकास कामांवर खर्च केला असता, तर बंर झालं असतं. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची ही नौटंकी सुरू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

उदयनराजेंनी एकदा आरोग्य मंत्र्याची भेट घेतली म्हणून मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला, असं नाही तर त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले होते. मागील 10 वर्ष उदयनराजेंनी आरोग्य मंत्र्याची भेटी का घेतली नाही?,का आरोग्य मंत्र्याचा पत्ताच सापडला नाही, असा खोचक सवालही शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.

दरम्यान, गेल्या महिन्यात राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपचे 25 टक्के उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तर असे भ्रम होतात म्हणे!”

“शाहरुख खानच्या मुलाला सोडून द्या, मी पण गांजा घेतला होता”

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

”जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ शब्द कोणी खेचू शकत नाही’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

“…तर मोठी किंमत मोजावी लागेल”; मेहबूबा मुफ्तींचा मोदींना थेट इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More