महाराष्ट्र मुंबई

“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार”

मुंबई | यंदाचं पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक आहे. कारण विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गुन्हा दाखल होताच फरार होणार, असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जोरदार चिमटा काढला आहे.

जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करुन घेतल्याचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे.

औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून ऐन अधिवेशनाच्या तोंडावर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली ‘ही’ ऑफर

-ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

-जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

-अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या