‘लोग कहते है मैं शराबी हूं’ गाण्यावर भाजप आमदाराचा बेधुंद डान्स

लखनऊ |  उत्तर प्रदेशमधील भाजप आमदाराचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. भाजप आमदार महिला डान्सरसोबत चक्क डान्स करताना या व्हीडिओत दिसत आहे.

रानीगंज विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. अभयकुमार उर्फ धीरज ओझा असं त्यांचं नाव आहे.

शराबी सिनेमाच्या ‘नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है ये बताओ तो जरा…लोग कहते है मैं शराबी हूं…।’ या गाण्यावर नाचताना काही कार्यकर्त्यांनी दारू पिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, एका कार्यकर्त्याची नजर व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्तीवर पडली, त्यावेळी त्याने त्याच्याकडील मोबाईल हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-

-…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या