भोपाळ | राहुल-प्रियांका यांनी रक्षाबंधन साजरा केलेला फोटो माझ्या पाहण्यात आलेला नाही. तुमच्यापैकी कुणी पाहिला असेल तर तो मला दाखवा आणि बक्षिस घेऊन जा, अशी पैज भोपाळचे भाजप आमदार विश्वास सारंग यांनी लावली आहे. ते भोपाळमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीशी जोडलेला सण आहे. त्याच्याशी काँग्रेस नेत्यांना काहीही घेणं-देणं नाहीये. ते इटलीची परंपरा मानतात. त्यामुळे ते कधीही रक्षाबंधन साजरा करत नाहीत. काँग्रेस नेते राहुल-सोनिया सांगतील तसंच वागतात, असं म्हणत सारंग यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षीस घेऊन जा, असं सारंग यांनी यावेळी म्हटलं.
भाजपच्या काळात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनचा मोठा कार्यक्रम व्हायचा. काँग्रेसच्या काळात मात्र असं चित्र बघायला मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
-RSS सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करतं; सरसंघचालक मोहन भागवत यांची कबुली
-पोलीस मुख्यालयात गळफास घेऊन API ची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
-रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड अन् सोशल मीडियावर गदारोळ; फॅन्स म्हणतात…
-काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने घेतली 11 कोटींची कार!
-‘ही’ अभिनेत्री उचलणार पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी
Comments are closed.