बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना तर संपला” असं म्हणणाऱ्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील नवाबगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचं कोरोनामुळे बुधवारी दुर्दैवी निधन झालं. केसर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात केसर सिंह यांनी आपल्या अखेरच्या घटका मोजल्या.

आमदार केसर सिंह गंगवार यांना विधानसभेच्या बाहेर पत्रकाराने विनामास्क फिरत असताना प्रश्न विचारला होता की, कोरोना काळामध्ये आपण मास्क का नाही लावला? त्यावर आमदार साहेबांनी आता कोरोना संपला आहे, कोरोना कुठे आहे? असं म्हणत फोनवर बोलत तिथून निघून जाणं पसंत केलं होतं.

10 एप्रिलला केसर सिंह यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बरेली येथे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना जवळपास 24 तास बेड मिळाला नव्हता, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला. त्यामुळे त्यांना नोएडाच्या यथार्थ रुग्णालयात नंतर भरती करण्यात आलं.

आमदार केसर सिंह गंगवार यांचा मुलगा विशाल याने योगी सरकारवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फोन करूनही कोणी प्रतिसाद देत नव्हतं आणि स्वतःच्या आमदाराचा योगी सरकार इलाज करू शकली नाही, असाही आरोप त्यांनी केला. कोरोना संसर्ग झाल्यानंतर 18 एप्रिलला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्र लिहून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात बेड मिळावा यासाठी विनंतीदेखील त्यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या

‘कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा’; मुंबईतील 102 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘या’ लोकांना कोरोनाच्या दोन डोसची गरज पडणार नाही; संशोधक म्हणतात… 

धक्कादायक! कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून अत्यंत क्रूरपणे तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More